बातमी संकलन बालू वंजारी (आमगाव)
खरिपात आलेली तूट कशीबशी रब्बी व उन्हाळी पिकातून भरून काढता येईल, चार पैसे वाचले तर घराची डागडुजी, पोराबाळांचे शिक्षण, मुलीच्या विवाहसाठी मदत होईल, ही अपेक्षा बाळगून शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून मक्का, धान व इतर पिकांची लागवड केली. सुदैवाने पीक सुद्धा चांगले आले. मक्याची तोडणी विक्रीसाठी करून ते बाजारपेठेत नेऊ, अशी स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशेवर अवकाळी पावसाने पाणी फेरले. अवकाळीने तोंडचा घास हिरावून नेल्याने आपली व्यथा आता कुणाला सांगायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.मागील आठवडाभरापासून अवकाळी पाऊस जिल्ह्यात सातत्याने हजेरी लावत आहे. रविवारपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी आणि मंगळवारी (दि. २) जिल्ह्यात सरासरी ३८.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात प्रथमच असा पाऊस पाहिल्याचे जिल्ह्यातील जुने जाणते शेतकरी सांगतात. जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ उन्हाळी धानाची सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यंदा ५२ हजार हेक्टरवर धानाची, तर ४ हजार हेक्टवर मका पिकाची लागवड करण्यात आली. धान पीक निघण्यास अजून थोडा कालावधी आहे. मात्र अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनीता लुक्यात मका पिकाची मोठ्या सुरू आहे. मात्र, याच दरम्यान केलेला मका मोठ्या प्रमाणात लागवड केली असून, सध्या पिकाची तोडणी आणि मळणीचा हंगाम अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तोडणी आणि मळणी भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे भिजलेला मका उन्हात वाळू घालून त्याची विक्री करून किमान लागवड खर्च तरी भरून निघेल यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. तर अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे धान पिकावर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, अनेक शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे
पंचनामे करून नुकसानभरपाई त्वरीत करा - तीरथ येटरे
अवकाळी पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरातील मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर सालेकसा, देवरी, आमगाव या परिसरात धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च भरून निघण्याची शक्यता कमी असल्याने त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण असून, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी माजी उपसपंच रिसामा तीरथ येटरे यांनी केली आहे.