आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी पोलीस ठाण्यात दिली भेट ...!
बात्मी संकलन सुमित ठाकरे (आमगाव)
पोलीस विभाग समाजाचे रक्षण करतात व विविध समस्यांना तोंड देत समाजात शांतता प्रस्थापित करतात. पोलीस मित्र बनून पोलीस विभागाची कार्यशैली समजून घेण्यासाठी आदर्श कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथील कला विभागाचे विद्यार्थ्यांनी आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी स्थानिक पोलीस स्टेशन येथे भेट देऊन पोलीस स्टेशन मधील विविध कार्य व्यवस्था समजून घेतल्या व उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या.
या प्रसंगी पोलीस ठाणेदार श्री युवराज हांडे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन मधील प्रत्येक विभाग कसा कार्य करतो हे आपल्या पोलीस सहकार्यांच्या मदतीने मोठ्या हिरीरीने समजावून दिले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात व शांततेत सर्व माहिती ऐकून पोलीस विभागाच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पोलीस ठाणेदार श्री युवराज हांडे व श्रीमती भारती मॅडम यांची मुलाखत घेऊन त्यांचा सारखा
बनण्याची इच्छा प्रगट केली.पोलीस निरीक्षक व श्रीमती भारती मॅडम यांनी कला विभागातील विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कसे अधिकारी बनता येईल यावर मार्गदर्शन केले.या पोलीस स्टेशन भेट उपक्रमामध्ये विद्यार्थ्यासोबत शाळेचे पर्यवेक्षक प्रा. श्री यु एस मेंढे, प्रा श्री पी जी कावळे, प्रा कु. आर जी अंबुले व प्रा. कु एस टी पटले उपस्थित होते.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशन परिसर व आदर्श विद्यालय ते पोलीस स्टेशन मार्गांवर वृक्षारोपण केले.व देशाचे जवाबदार नागरिक बनण्याचे व देश सेवा करण्याचे प्रण घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थी खूप आनंदीत झाले.