लहान मुलांना जपा, शहरात डोळ्यांची साथ पसरतेय...!
बात्मी संकलन धीरज ठाकरे
सध्या पावसाचे दिवस असून, या दिवसात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. मात्र, तरीही अनेक जंतूंचा प्रादुर्भाव होत असल्याने अनेकांना संसर्गजन्य आजाराची लागण होते. अशातच गोंदिया शहरात लहान मुलांचे डोळे येण्याची साथ सुरू झाली आहे. याची बाधा झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावल्याचे चित्र आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत डोळ्यांच्या आजाराची साथ पसरली आहे.पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये सध्या डोळे येण्याची साथ सुरू झाल्याचे आढळून येत आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात डोळे तपासणी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्यादेखील वाढली असून, डोळे येण्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. अनेक विद्यार्थी डोळे येण्याच्या आजाराने ग्रासले असल्याने शाळांमधील उपस्थितीवर परिणाम जाणवू लागला आहे.
नेत्र ड्रापचाही होत आहे तुटवडा
छोटांपासून मोठ्यांपर्यंत डोळ्यांच्या आजाराची साथ वाढत असून, उपचारासाठी रुग्णांची धावपळ दिसून येत आहे. काही रुग्ण रुग्णालयात जात आहेत. काही रुग्ण मेडिकल स्टोअर्समध्ये डोळ्यांच्या औषधीसाठी गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला पाच सहा दिवस खासगी मेडिकलमधून रुग्णांना डोळ्यांची औषधी मिळाली. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मेडिकलमध्ये नेत्र ड्रॉपचाही तुटवडा निर्माण झाला आहे. मेडिकल एजन्सीमध्येच नेत्र ड्रॉप उपलब्ध नाही. तेथील साठा संपला, अशी माहिती एका मेडिकल संचालकांनी दिली.
अशी आहेत लक्षणे
■ डोळ्यात टोचणे, खुपल्यासारखे होणे, डोळ्यांचा रंग लाल, गुलाबी होणे, जळजळ होणे.