राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने मनोहर भिडे च्या आक्षेपार्ह विधानांचा निषेध

 राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने मनोहर भिडे च्या आक्षेपार्ह विधानांचा निषेध


दुर्योधन नागरीकर गोंदिया


राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पंडित जवाहरलाल नेहरू व साईबाबा यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचं तिव्र जाहिर निषेध करून मनोहर भिडे याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन मा.जिल्हाधिकारी गोंदिया मार्फत मा.ना.मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना देण्यात आले. दरम्यान माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर, ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर दोनोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालयापासून राजलक्ष्मी चौक पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. राजलक्ष्मी चौक स्थित सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून महापुरुषांचा अपमान करणाऱ्या मनोहर भिडे याला अटक करा अश्या घोषणा देत निषेध करण्यात आला.   आज गोंदिया जिल्हा ओबीसी सेल राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी च्या वतीने महापुरुषांचा अपमान करून जनसामान्य लोकांच्या भावनांना ठेच पोहचविण्याचे काम करून समाजात असंतोष निर्माण करणाऱ्या मनोहर भिडे याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी या मागणीला घेऊन निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनोहर भिडे यांच्या जाहीर निषेध करण्यात आला. या निषेध आंदोलनात सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, प्रभाकर दोनोडे, यशवंत गणवीर, सुरेश हर्षे, विशाल शेंडे, रफिक खान, अशोक सहारे, केतन तुरकर, मनोज डोंगरे, मोहन पटले, डॉ अविनाश काशिवार, लोकपाल गहाणे, डॉ अजय उमाटे, विनीत सहारे, सचिन शेंडे, निरज उपवंशी, अजय लांजेवार, राजू एन जैन, बिसराम चर्जे, अशोक गोस्वामी, रमेश रहांगडाले, डॉ खान, खालिद पठाण, नानू मुदलियार, डॉ माधुरी नासरे, सुशीला भालेराव, कुंदा दोनोडे, चेतना पराते, जगदीश बावनथडे, प्रदीप रोकडे, सुनील थोटे, निशिकांत पेठे, संदीप मिश्रा, ओमप्रकाश लांजेवार, सय्यद इकबाल, राजकुमार ठाकरे, समीर कटरे, चंद्रकुमार चुटे, एकनाथ वहिले, युनूस शेख, जिम्मी गुप्ता, चंचल चौबे, हरगोविंद चौरासिया, नागो बन्सोड, सुनील पटले, शैलेश वासनिक, झनकलाल ढेकवार, तुळशीदास कोडापे, संजय ईश्वर, रतिराम राणे, श्याम चौरे, मधुकर भोयर, विनोद चुटे, सत्यवान नेवारे, आशिष टेम्भूरकर, नेमीचंद ढेकवार, तुषार उके, संतोष गायधने, विनोद मेश्राम, विनायक शर्मा, सौरभ जायस्वाल, कपिल बावनथडे, आरजू मेश्राम, रौनक ठाकूर, रवींद्र मस्करे, राजू येडे, प्रतीक पारधी, विष्णू शर्मा, श्रेयश खोब्रागडे, हर्षवर्धन मेश्राम, कुणाल बावनथडे, कान्हा बघेले, शरभ मिश्रा, नरेंद्र बेलगे सहित असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post