पालकमंत्र्यांच्या आगमनाचा पहिलाच मुहूर्त हुकला तर जिल्हाचा विकास होनार का !
गोंदिया जिल्हा आणि बाहेरील पालकमंत्री हा विषय नेहमीच चर्चेत असतो. जिल्ह्याला चार वर्षात पाच पालकमंत्री मिळाले. पण, हे सर्वच बाहेरील असल्याने जिल्ह्याच्या विकासाला ब्रेक लागल्याचे चित्र आहे. नियोजन समितीची निवडणूक अद्याप झालेली नाही. त्यातच नव्याने निवड झालेले पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे बुधवारी (दि. १८) जिल्ह्याच्या दौयावर येणार होते, पण ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला. पालकमंत्री प्रथमच जिल्ह्याच्या दौयावर येणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी जय्यत तयारी केली होती. पण, ऐनवेळी या सर्वांचा हिरमोड झाला. पालकमंत्र्यांच्या दौयाचा पहिलाच मुहूर्त हुकल्याने पुढे वर्षभर काय, व आसन जिल्हाच विकास होनार का अशी चर्चा सर्व सामान्य चा वतीने व्यक्त होत आहे.