रवींद्र टोंगे यांचा पुन्हा उपोषणाचा सरकारला इशारा

 राष्ट्रीय ओबीसी ओबीसी विद्यार्थी महासंघाचे विचार मंथन. 



       आज राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाद्वारे धनवटे नॅशनल महाविद्यालयात विदर्भ स्तरीय "ओबीसी युवांचे विचारमंथन" कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय विशेष ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, उपाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे ,राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे ऋषभ राऊत, ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे, जिल्हाध्यक्ष निलेश कोढे ,शहराध्यक्ष विनोद हजारे, पराग वानखेडे मंचावर उपस्थित होते या डॉ बबनराव तायवडे यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांनी ओबीसी न्याय हक्कासाठी रस्त्यावर लढाई लढायला तयार राहावे , राष्ट्रीय ओबीसी महासंघ सतत ओबीसीच्या प्रश्नावर घेऊन सरकारविरुद्ध आपली लढाई चालू ठेवतील असे सुद्धा त्यांनी सांगितले ,ओबीसी युद्ध म्हणून रवींद्र टोंगे यांनी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी जीवाची पर्वा करणार नाही , सदैव ओबीसीच्या लढ्या साठी तयार राहील आणि दिवाळीनंतर ओबीसी विद्यार्थ्यांचे 72 स्वतंत्र वस्तीगृह सुरू न केल्यास पुन्हा नागपूर मध्ये बेमुदत अन्यथा आंदोलन सुरू करणार असा इशारा रवींद्र टोंगे यांनी दिला ,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर विचार व्यक्त करतांनी त्यांनी सांगितले की एक नोव्हेंबर पासून चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसीच्या भविष्यासाठी भेटीगाठी जनजागृती अभियान सुरवात रवींद्र टोंगे यांच्या वेंडली या गावातून सुरवात करून संपुर्ण जिल्ह्यात जनजागृती करणार आहे असे त्यांनी सांगितले ,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश कोढे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन रितेश कडव यांनी व आभार प्रदर्शन विनोद हजारे यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून शहराध्यक्ष परमेश्वर राऊत डॉ राजू गोसावी आशिष तायवाडे , शुभम वाघमारे,गणेश आवारी, खुशी दुरुगकर, अपेक्षा नेउल,आदेश बोरकर, संजना ढोले, तक्षशिला धुरंधर, उन्नती सोंकुवर, राहुल निमजे, शंतनु धोटे , राकेश इखार, अमेय रोखडे, नीरज बोंडे , आयुष पाटील , तुषार ठाकूर , खुशबू दियेवार, हुमानशी धारपूरे , लोकेश बारापात्रे, अचाल पेंदाम, सुधांशू बावणे पूनम जैन, खुशाली मेश्राम, रिधद्धी गुप्ता तसेच प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ओबीसी विद्यार्थ्यांची व युवा ची संख्या उपस्थितीत होती.

Post a Comment

Previous Post Next Post