भंडारा चार ठिकाणी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपैकी भंडारा आणि लाखनी येथे २८ एप्रिल रोजी तर लाखांदूर आणि पवनीसाठी ३० एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे भंडारा कृषी उत्पन्न बा भंडारा आणि लाखनी बाजार समितीसाठी उद्या मतदान
जार समितीसाठी नगर परिषद गांधी विद्यालयात चार गटांसाठी सहा मतदान केंद्र ठेवण्यात आले आहेत, तर लाखनी बाजार समितीसाठी समर्थ विद्यालय लाखनी आणि नंदलाल कापगाते विद्यालय साकोली या ठिकाणी १० मतदान केंद्र राहणार आहेत.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
चारही बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीन पक्षांसोबत शिवसेनादेखील दोन बाजार समितीमध्ये रिंगणात आहे.तर लाखनी आणि भंडारा या दोन बाजार समित्या नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केल्याने अनेकांचे लक्ष लागले आहे.