आमगाव पोलिसांची धडक कारवाई: २१.९३ लाखांचा अवैध दारू माल जप्त
आमगाव पोलिसांची एकाच रात्री दोन कारवाई
आमगाव, १८ नोव्हेंबर: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतुकीविरोधात आमगाव पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. दोन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण २१,९३,२९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे१७ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता, गुप्त माहितीच्या आधारे आमगाव पोलिसांनी कट्टीपार गाव परिसरात गस्त घालत असताना एक काथ्या रंगाची डस्टर गाडी संशयितरीत्या जाताना दिसली. गाडी अडवून तपासणी केली असता १२,७६,८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये विविध प्रकारच्या देशी-विदेशी दारूचे पव्वे, मोबाईल फोन, आणि वाहनाचा समावेश आहे.या प्रकरणी महेश चुटे (रा. गोरठा), विकास शेंडे (रा. भोसा), रवी चुटे (रा. कालीमाटी), राजेंद्र चौरीवार (रा. कट्टीपार), महेंद्र सेवत (रा. कट्टीपार) यांना अटक करण्यात आली असून मनोज अळमे (रा. मक्कीटोला) हा आरोपी फरार आहे.त्याच रात्री कट्टीपार परिसरात दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी थांबवली. तपासणी दरम्यान ९,१६,४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये देशी दारूचे पव्वे, मोबाईल फोन आणि बोलेरो गाडीचा समावेश आहे.या प्रकरणी डेलेंद्र हरीनखेडे (रा. परसवाडा) याला अटक करण्यात आली असून सोमेश्वर सोनवाने (रा. परसवाडा) फरार आहे.डस्टर गाडीतील माल: १२,७६,८७० रुपये बोलेरो गाडीतील माल: ९,१६,४२५ रुपयेएकूण मुद्देमाल: २१,९३,२९५ रुपये ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक तिरुपती राणे व त्यांच्या पथकाने केली.आमगाव पोलिसांनी दाखवलेल्या दक्षतेमुळे अवैध दारू वाहतुकीवर मोठा आळा घालण्यात आला आहे. या कामगिरीमुळे पोलिस दलाचे कौतुक होत असून विधानसभा निवडणुकीच्या काळात अशीच सतर्कता कायम ठेवली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.