महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा तिसऱ्या आघाडीत प्रवेश

 


महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा तिसऱ्या आघाडीत प्रवेश

गोंदिया ;GONDIA विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकीय उलथापालथीला वेग आला आहे. दादा गटाने विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे तिकीट कापल्याने त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. चंद्रिकापुरे यांनी तिसऱ्या आघाडीत प्रवेश करून त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाची दिशा ठरवली आहे.चंद्रिकापुरे हे अर्जुनी मोरगावमध्ये प्रभावशाली नेते मानले जातात. तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यावर तोडगा काढत त्यांनी तिसऱ्या आघाडीत प्रवेश करून आपल्या समर्थकांना नवीन पर्याय दिला आहे. या प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी चंद्रिकापुरे यांचे स्वागत करत त्यांचा अनुभव पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असे मत व्यक्त केले. चंद्रिकापुरे यांचा हा निर्णय पक्षाच्या स्थानिक आणि राज्य पातळीवरील राजकारणावर मोठा प्रभाव पाडणार असल्याचे मानले जात आहे.विधानसभा निवडणुकीतील या नव्या घडामोडीमुळे अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post