शेतकरी शेतमजूर वन हकका साठी एल्गार पुकारला ..

 

वृत्त संकलन धीरज ठाकरे 








दिनांक 23 एप्रिल 2023 रविवार रोजी परसोडी रयत नवेगाव बांध ता. मोरगाव अर्जुनी जिल्हा गोंदिया येथे *भव्य शेतकरी शेतमजूर एल्गार परिषद* आयोजित करण्यात आली होती .सदर परिषदेचे उद्घाटक म्हणून मा. उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ तर परिषदेचे अध्यक्ष म्हणून अड.राजेंद्र जी महाडोळे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी क्रांती दल मा. आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे ,मा. राजेंद्र जैन , माजी आमदार मा.बापूसाहेब भुजबळ कार्याध्यक्ष समता परिषद म. रा.सौ. रंजना ताई पारशिवे विदर्भ अध्यक्ष भोई समाज सेवा संघ मा. ईश्वर बाळबुद्धे प्रदेशाध्यक्ष ओबीसी सेल मा.दिवाकर जी गमे, सौ. रंजनाताई वाटगुरे सरपंच परसोडी रयत प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटन पर *बोलताना मा.छगनराव भुजबळ साहेब यांनी शेतकरी शेतमजूर यांना गावालगत वना मधील वनसंपत्ती गोळा करण्यावर वन विभागाने जे निर्बंध घातले त्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान* , *शेतकरी शेतमजुरांचे होत आहे हे निर्बंध हटवण्याबाबत विधानसभेमध्ये प्रश्न मांडून न्याय मिळवून देण्यात येईल, असे आश्वासित केले.* *तसेच वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या हत्या व जखमी झालेल्या त्यांच्या कुटुंबाला भरीव नुकसान भरपाई देण्याकरता आवाज उठवण्यात येईल* तसेच शेतकरी शेतमजूर च्या मागण्यावर सभागृहात आणि रस्त्यावरचा संघर्ष करणाऱ्या एल्गार परिषदेच्या विविध मागण्या च्या लढ्याला भरभक्कमपणे समर्थनार्थ उभे राहू असेही मा. भुजबळ यांनी भक्कम पने सांगितले, शेतकरी शेतमजूर एल्गार परिषदेमध्ये *मा.छगनरावजी भुजबळ साहेबांच्या अमृत महोत्सव निमित्त महामानवावर लिखित विचारांची ग्रंथ तुला करण्यात आली.यामधे 1000 पुस्तके वितरित करण्यात येणार.* 

मा.अड.राजेंद्र जी महाडोळे यांनी अध्यक्ष भाषणामध्ये विदर्भातील शेतकरी शेतमजूर यांच्यावर होणाऱ्या अन्याला वाचा. फोडण्याकरिता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे .त्यासाठी संघर्ष उभा केला जाईल यामध्ये ते बोलताना *सिंचना करता शेतकऱ्यांना विहीर व आल्पभूधारक शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर बोअरवेल मोटर पंपासह मिळण्याकरता* *तसेच, प्रति एकरी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये वार्षिक शेत लागवड खर्च देण्यात यावा ,* *वयाच्या पंधरा वर्षापासून शेतकरी शेतमजूर शेतामध्ये राबतो म्हणून त्यांना पेन्शन देणे गरजेची आहे* ,व यासाठी व इतर मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात संघर्ष उभा केला जाईल ,असे अध्यक्ष भाषणांमध्ये आव्हान करून एल्गार परिषदेमध्ये ठराव मंजूर करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मा.देविदासजी गुरनुले तर सत्कार समिती अध्यक्ष म्हणून मा.प्रवीण भाऊ पेटकर सूत्रसंचालन मा.राजेंद्रजी मांदाडे मा.अमोल दादा गुरनुले यांनी केले या पहिल्या एल्गार परिषदेचे आयोजन तुलाराम मोहुरले, मनोहर ठाकरे ,पुनाजी वाडगुरे आत्माराम वाडगुरे, भैयालालजी पेटकुले ,सुखदेव नागरिकर ,राजकुमार मोहरले, हरिश्चंद्र जेंगठे,सुखदेव वाढई , उमेश गुरनुले ,माधवराव मांदाडे, भरत सोनू, बापूदास कावळे, कमलेश गुरनुले, राजू कावळे ,दिनकर मोहरले ,अशोक शेंडे , राजेश गुरनुले, निशिकांत वाडगुरे, महेंद्र गुरनुले, विठ्ठलराव नाकतोडे, अनिल डोंगरवार, रामलाल लांजेवार, व गावातील सर्व युवक व महिलांनी अथक परिश्रम केले

Post a Comment

Previous Post Next Post