विदर्भ हे जगाचे टायगर कॅपिटल - सुधीर मुनगंटीवार

 गोंदिया : जगात चौदा देशांत वाघांचा अधिवास आहे. वाघांची सर्वाधिक संख्या ही भारतात व त्यातही महाराष्ट्रात विदर्भात आहे. महाराष्ट्रात २०१४ मध्ये १९० वाघ होते ते २०१९ च्या गणनेत ते ३१२ झाले आणि आता ५०० च्या वर वाघांची संख्या आहे. यात सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत. याचाच अर्थ विदर्भ हे जगाचे टायगर कॅपिटल झाले आहे, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातून आणण्यात आलेल्या वाघीण नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात शनिवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आल्या. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खा. सुनील मेंढे, अशोक नेते, आ. विजय रहांगडाले, मनोहर चंद्रिकापुरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक रंगनाथ नाईकडे, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी प्रकल्प डॉ. रामगावकर, विशेष पोलिस महासंचालक संदीप पाटील, उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव नागझिरा जयरामेगौडा आर, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपसंचालक पवन जेफ, विभागीय वन अधिकारी प्रदीप पाटील व राजेंद्र सदगीर यावेळी उपस्थित होते. भारत सरकारने






पहिल्या टप्प्यात पाच वाघांचे स्थानांतरण करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार आज नवेगाव नागझिरा प्रकल्पात वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.या ठिकाणी ११ टायगर असून, वीस वाघ अधिवास क्षमता आहे. वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांसाठी 7 नवेगाव नागझिरा आकर्षण केंद्र ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post