भंडारा: - भंडारा जिल्हा बॉस्केटबॉल असोसीएशन आणि एकविध क्रीडा संघटना भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय स्तरीय बॉस्केटबॉल स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक ३ व ४ जून २०२३ ला स्थानिक श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनात करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन ३ जून २०२३ ला संध्याकाळी ६ वाजता भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. सुनील मेंढे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, महाराष्ट्र बॉस्केटबॉल असोसीएशनचे अध्यक्ष धनंजय वेलुरकर, सचिव शत्रुघ्न गोखले, बॉस्केटबॉल प्रशिक्षक राजेश क्षत्रीय इत्यादी मान्यवर उ
पस्थित राहणार आहेत. तरी विभागातील खेळाडूंनी जास्तीत -जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन बॉस्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुर्यकांत इलमे, उपाध्यक्ष जैराम बावणे, सचिव शामू बांते, मुख्य मार्गदर्शक मोहन दाढी, सहसचिव स्वप्नील जाधव, कोषाध्यक्ष आकाश खोत, मंथन जगनाडे, कुणाल चौरागडे, भरत बलवानी, तृप्ती मेश्राम यांनी केले आहे.