तब्बल ७ वर्षानंतर; पुन्हा सुरू झाली शाळा! विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

 



सालेकसा : सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षल प्रभावित भागातील शाळा पटसंख्येअभावी मागील सहा वर्षांपासून बंद पडली होती. तब्बल सहा वर्षांपासून शाळा बंद असल्याने शाळेची इमारत सुद्धा मोडकळीस आली होती. तर गावातील विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणासाठी दूरवर पायपीट करावी लागत होती. पण गावकरी आणि जि. प. शिक्षण विभागाने पुढाकार घेत तब्बल सहा वर्षांनंतर ही शाळा शुक्रवारपासून (दि. ३०) सुरू केली. त्यामुळेच प्रथमच शाळेची घंटा वाजल्याने विद्यार्थी आणि त्यांच्या पाल्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते.

नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या जि. प. शाळा मुरकुटडोह येथे शाळेच्या पहिल्या दिवशी २२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, सरपंच, अधिकारी व इतर लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बालकांचे मोफत पाठयपुस्तके, गणवेश, पुष्पगुच्छ आणि गोड पदार्थ देऊन स्वागत करण्यात आले. अदानी फाऊंडेशन, तिरोडाच्या सौजन्याने स्कुल बॅग, पिण्याच्या पाण्याची बॉटल व शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या सालेकसा तालुक्यातील मुरकुटडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सन २०१६ वर्षांपासून बंद होती पटसंख्येअभावी बंद पडलेली ही शाळा सहा वर्षांनंतर शिक्षण विभागाने पुन्हा सुरू केली आहे. शुक्रवार पासून या शाळेत चिमुकल्यांचा किलबिलाट सुरू झाला. शाळेच्या पहिल्या दिवशी जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी आमदार संजय पुराम, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती यशवंत गणवीर जि प. सदस्य हनवंत वट्टी, जि. प. सदस्या गीता लिल्हारे, पं. स. सभापती प्रमिला गणवीर, जि. प. सदस्या विमल कटरे, छाया नागपुरे, वंदना काळे, सरपंच जमना मरकाम, अर्चना मडावी, पं.स. सदस्य नितेश वालदे, जुमानसिंग उपराडे, विरेंद्र उईके, सुनीता राऊत, रेखा फुंडे, इनवाते, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये, गटशिक्षणाधिकारी विशाल डोंगरे, अदानी समूहाकडून बिमूल पटेल, राहुल सेजाव, गावातील नागरिक उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post