अब ब संतप्त गावकऱ्यांनी 10 -15 टिप्पर रोखुन केला आंदोलन..

रस्त्याची दुरवस्था : महिनाभरापासून अपघाताची मालिका सुरूच.

आता तरी प्रसाशनाने कुंभकरनेच्या झोपेतून उठावे - गावकरी 

बात्मी संकलन (बालू वंजारी) 

-आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध येथील गिट्टी खदान येथून गिट्टी वाहून नेणारे जड वाहने गावातूनही भरधाव वेगात धावतात. त्यामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरक्षः चाळण झाली आहे. पावसाळ्यात नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. या खड्यांमुळे दररोज छोटे मोठे अपघात घडत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या शिवणीवासीयांनी शनिवारी (दि. २९) सायंकाळी ६ वाजता या जड वाहनांचा रास्ता रोको केला. यामुळे या मार्गावर टिप्परची लांब रांग लागली होती.आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध येथील गिट्टी वाहतूक करण्यासाठी टिप्परचा


वापर केला जातो. हे टिप्पर चालक चिरचाळबांध मार्गे खुर्शीपार होत दहेगाव येथील राष्ट्रीय महामार्गासाठी गिट्टी नेतात. तर काही टिप्पर आमगाव तालुक्यात गिट्टी पुरवठा करण्यासाठी चिरचाळबांध शिवणी- किडंगीपार या मार्गाचा वापर करतात.या जड वाहनांमुळे रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. तरीही टिप्पर चालक गावातून वाहन भरधाव वेगात नेतात. यासंदर्भात अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची ओरड असताना त्यांच्या या समस्येकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नव्हते. परिणामी नागरिकांनी एकत्र येत शनिवारी या जड वाहनांचा रस्ता रोखून धरला. घटनेची माहिती मिळताच आमगावचे ठाणेदार युवराज हांडे यांनी घटनास्थळ गाठले. लोकांशी चर्चा केली. यावर तोडगा काढण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले.




• धावत्या टिप्परमधून पडते गिट्टी

 टिप्परमध्ये गिट्टी भरून वाहतूक करीत असताना टिप्परमध्ये खूप जास्त गिट्टी टाकली जात असल्याने काही टिप्परमधील गिट्टी ही धावताना रस्त्याला पडते. ते टिप्पर ज्या दुचाकीच्या जवळून जाईल त्या दुचाकी चालकाला धावणाच्या टिप्परची गिट्टीचा जबर मार लागतो. यात लोकांचा नाहक बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.


जाहिरात 


Post a Comment

Previous Post Next Post