स्वातंत्र्यदिनी आदर्श च्या विद्यार्थ्यानी सादर केले १११ विज्ञान मॉडेल
आमगाव सुमित ठाकरे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी ७७ व्या स्वातंत्र दिनी आदर्श कनिष्ठ महाविद्यालय आमगाव च्या विद्यार्थ्यांनी १११ विज्ञान मॉडेल सादर करण्याचा भव्य उपक्रम केला आहे.
थिंक लाईक ए सायंटिस्ट या विषयावर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे विज्ञान मॉडेल तयार केले व त्याचे निरीक्षण व प्रशंसा संपूर्ण आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी मोठ्या उत्साहात केले.या विज्ञान प्रदर्शनी चे उदघाटन भवभूती शिक्षण संस्थेचे सचिव माजी आमदार श्री केशवराव मानकर यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेशबाबू असाटी, उपाध्यक्ष श्री प्रमोद कटकवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी प्राचार्य श्री डी एम राऊत, संचालक श्री ललित मानकर, श्रीमती उर्मिला ताई कावळे, सौ स्नेहा ताई मानकर , उपमुख्याध्यापक श्री के एस डोये, पर्यवेक्षक श्री डी बी मेश्राम, सेवा निवृत्त शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते.१५ ऑगस्ट स्वातंत्र दिनाच्या ध्वजारोहणं नंतर विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीत व भाषण झाले. या नंतर आयोजित या विज्ञान प्रदर्शनी उपक्रमाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घेतला व भविष्यात आपण सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विविध् उपक्रम करण्याचा निर्धार केला.या विज्ञान प्रदर्शनीत वर्ग ११ व १२ वी च्या १५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. या प्रसंगी प्राचार्य श्री डी एम राऊत यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. या सर्व प्रयोगाचे परीक्षण करण्यात आले. परीक्षक म्हणून शाळेतील शिक्षक श्री वी एल धकाते, श्री ए एल कटरे व श्री के पी उके यांनी कार्य सांभाळले.या विज्ञान प्रदर्शनी साठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक कु टी टी पटले , श्रीमती वाय जी हलमारे, श्री एस एस प्रजापती, श्री वी एल धकाते, श्री ए बी खोब्रागडे, कु चुटे, सौ सतोकर व इतर विज्ञान शिक्षकांनी परिश्रम घेतले.या विज्ञान प्रदर्शनी सोहळ्याचे संचालन पर्यवेक्षक श्री यु एस मेंढे व आभार प्रा. कु टी टी पटले यांनी केले.