Breking News 8 हजाराची लाच प्रकरनी प्रभारी दुय्यम निंबधक मेश्राम एसीबीच्या जाळ्यात

 8 हजाराची लाच प्रकरनी प्रभारी दुय्यम निंबधक मेश्राम एसीबीच्या जाळ्यात.





बातमी संकलन सुमित ठाकरे आमगांव

 :- सालेकसा येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे प्रभारी दुय्यम निंबधक व आमगाव येथील कनिष्ठ लिपिक असलेले लोकसेवक मधुकर लोकनाथ मेश्राम वय 50 रा. गोंदिया यांना 8 हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी पडताळणीनंतर लाचलूचपत विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. तक्रारदार हे सालेकसा तालुक्यातील सोनारटोला / गिरोला येथील शेतकरी असून त्यांनी खरेदी केलेली मौजा धानोली येथील 16 आर शेत जमिनीची क प्रत जूनी आहे. तसेच जमिनीची रजिस्ट्री होणार नाही असे सांगून सदर शेत जमीनीची रजिस्ट्री करुण देण्याकरिता रु 8000/- रु ची मागणी आरोपी लोकसेवकांनी तक्रारदाराकडे केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे लाच मागणी पड़ताळनी दरम्यान आलोसे यांनी तक्रारदार यांच्या जमिनीची रजिस्ट्री करुन दिल्यानंतर त्या मोबदल्यात रु 8000/- रकमेची पंचासमक्ष मागणी करून लाच रक्कम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला.आरोपी लोकसेवक यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून स्वता:च्या लाभाकरीता गैर वाजवी फायदा मिळविण्याचा प्रयत्न केल्याने आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन - सालेकसा जिल्हा गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.सदर कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाचे पोलीस उपअधिक्षक विलास काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक अतुल तवाडे यांनी सापळा कारवाई केली. या सापळा कारवाईत स.फौ. विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे पो. हवा. संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, नापोशि संतोष बोपचे, अशोक कापसे, नापोशि प्रशांत सोनवाने, कैलाश काटकर, मनापोशी संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे आदी सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post