यमुना नगरी मध्ये चिखलाचे साम्राज्य नागरिकांना होतो नाहक त्रास

 यमुना नगरी मध्ये चिखलाचे साम्राज्य नागरिकांना होतो नाहक त्रास...





बात्मी संकलन नीकेश वानखेड़े चंद्रपुर (वरोरा)

शेगाव बु मधील मास्टर कॉलोनी म्हणून ओडखल्या जाणाऱ्या यमुना नगरी येथे नेहमीच पावसाच्या पाण्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. यामुळे तिथून ये जा करणाऱ्या स्त्रिया व मुले यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात शिव सेना(ऊ. बा. ठा.) युवासेना तालुका प्रमुख ओंकार लोडे यांना तक्रार प्राप्त होताच त्यांनी ग्रामपंचायत शेगाव येथे जाऊन निवेदन दिले. व लवकरात लवकर यावर पर्याय काडून मुरून टाकण्यात यावा अशी मागणी केली. त्यांच्या या निवेदनाची दखल घेत उद्याच त्या ठिकाणी मुरूम टाकून व्यवस्था करण्यात येईल असे आश्वसन ग्रामपंचायत सरपंच पाटील यांनी दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post