ग्रामपंचायत गोसाईटोला येथे घडविला नवा आदर्श...
दिनांक 11 ऑक्टोंबर 2023 रोजी ग्रामपंचायत गोसाईटोला येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक वाचनालयाचे उद्घघाटन पार पाडले. संपूर्ण विमा ग्राम म्हणून नावारूपाला आलेल्या गोसाईटोल्याला भारतीय जीवन बीमा निगम गोंदिया तर्फे २५ हजार रुपये पारितोषिक प्रदान करण्यात आले. संपूर्ण गाव बीमा ग्राम करण्यासाठी अभिकर्ता मोरेश्वर पटले यांनी अथक परिश्रम घेऊन या गावाला संपूर्ण विमा ग्राम म्हणून नावलौकिक मिळवून दिला . याबद्दल ग्रामपंचायत गोसाइटोला या गावास पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक भारतीय जीवन बीमा निगम तर्फे देण्यात आले. या रकमेचे सदुपयोग आणि सत्कार्य लागावे म्हणून ग्रामपंचायतीने मुलांच्या वाचनालयाची सोय व्हावी म्हणून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले. दिनांक 11 ऑक्टोंबर 2023 ला या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाप्रसंगी या जीवन विमा शाखा प्रबंधक माननीय अनिल पोकळे सर ,तसेच दीपप्रज्वलक म्हणून माननीय श्याम भिवापूरकर विक्री प्रबंधक शाखा गोंदिया तसेच प्रमुख अतिथी म्हणून माननीय निलेश्वरी ताई गौतम सरपंच ग्राम गोसाईटोला,सुनील चव्हाण सर CLI, माननीय रमेश टेंभरे पोलीस पाटील, राहुल चौधरी उपसरपंच, संतोष जी कुसराम मुख्याध्यापक ,समुद्राबाई मरकाम वैशालीताई चुटे सदस्य ग्रामपंचायत गोसाईटोला व संपूर्ण गावकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना दीपप्रज्वलक यांनी भारतीय जीवन विमा निगम संस्थेचे जीवनामधील महत्त्व समजावून सांगितले तसेच सार्वजनिक वाचनालयाची सुरुवात झाल्यामुळे विद्यार्थी व गावकरी बांधवांच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला. अतिशय अनोखी संकल्पना ग्रामपंचायतग्राम विमा योजनेच्या रकमेतून साकारलेल्या या सार्वजनिक वाचनालयाचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राला राहील. यासाठी अथक प्रयत्न मुनेश्वर पटले अभिकर्ता तथा सदस्य सदस्य ग्रामपंचायत गोसाइटोला ग्रामपंचायत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र बनसोड सर प्राथमिक शाळा गोसाईटोला यांनी केले. आभार प्रदर्शन मुनेश्वर पटले यांनी मानले.