🪔🪔दिवाळीच्या साहित्याने बाजारपेठ सजली🪔🪔
बात्मी संकलन मुनेश पंचेश्वर आमगांव
वर्षभरात साजरे केले जाणाऱ्या विविध सणांपैकी दीपावली या सणाबाबत आबालवृद्धांपासून साऱ्यांना विशेष आकर्षण असते. पाच दिवसांच्या या सणामध्ये प्रत्येक दिवसाचे एक वेगळे दिनविशेष असल्याने प्रत्येक दिवसासाठी लागणाऱ्या विविध स्वरूपातील वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारपेठेत हळूहळू गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची आपल्या दुकानाला पहिलीपसंती मिळावी यासाठी दुकानदारांनीही आपापली दुकानेविविध प्रकारे सजवून ठेवली आहेत, तर किराणा सामान, फटाक्यांची दुकाने,इलेक्ट्रॉनिक वस्तू, फूलवाल्यांची दुकाने, कपड्याची दुकाने, मिठाईचीदुकाने, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने आदी दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे.