बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पुन्हा चोरीचा प्रयत्न फसला
नीकेश वानखेडे चंद्रपुर
वरोरा - वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पुन्हा चोरीचा प्रयत्न फसल्याने चोरांनी ग्राम पंचायत कार्यालयातील वस्तूवर हात साफ करीत तिथून पळ काढला. वरोऱ्यापासून १२ की.मी. अंतरावर असलेल्या टेमुर्डा येथे बँक ऑफ महाराष्ट्र आणि ग्रामपंचायत लागून असून दोन्ही कार्यालयाची जोड भिंत आहे. चोरट्यांनी ग्रामपंचायतमध्ये प्रवेश करून तेथील कॅमेराची तोडफोड करून खिडकीची ग्रील तोडली आणि सीसीटीव्ही चा डिव्हीआर चोरला.त्यानंतर जोड भिंतीला होल करून बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जाण्याचा प्रयत्न केला. परंतु शेजारी असलेल्या एका घरच्या कुटुंबांना चोरीची बाब लक्षात आली. आणि चोरांचे लक्षात आले आणि चोर ग्रामपंचायतमधील किमती साहित्य घेऊन पसार झाले. ग्रामपंचायत मधील साहित्याची किंमत अंदाजे १६ हजार ५०० रुपये असल्याचे सरपंचांनी सांगितले. सदर घटना ८ डिसेंबर २०२३ ला रात्रो १२.३० च्या दरम्यान घडली.अज्ञात चोरट्यांनी ग्रामपंचायत मध्ये प्रवेश केला आणि तेथील साहित्याची चोरी केली. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये चोरी करण्यासाठी ग्रामपंचायत व बँकेची एकच भिंत असून त्या भिंतीला हॉल करून जेव्हा बँकेत जाण्याचा चोरांचा प्रयत्न होता तो मात्र ग्रामपंचायत व बँके शेजारी एका नागरिकांचे घर आहे. त्या घरातील मंडळी त्यावेळी जागी झाली त्यामुळे चोरांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तिथून पळ काढला.त्यानंतर नागरिकाने ग्रामपंचायत आपरेटर ला फोन केला, चोरीबाबत माहिती दिली. आपरेटर ने सरपंचाला कळविले त्यानंतर सरपंच घटनास्थळावर पोहचले आणि वरोरा पोलिसांना चोरीची माहिती दिली. विलंब न लावता घटनास्थळी पोलीस पोहचले. पोलीस निरीक्षक काचोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी चोरीचा तपास करीत आहे.याअगोदर सुद्धा पाच ते सहा वेळा बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये चोरीचा प्रयत्न झाला आहे.