आरोपींना चार महिन्यानंतर झारखंड राज्यातून अटक करण्यात पोलिसांना यश


बातमी संकलन सुमित ठाकरे/गोंदिया 

जिल्ह्याच्या आमगाव येथील मोबाईल दुकानातून साडेपाच लाखांहून अधिक रुपयांचे मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये हा प्रकार घडला होता. त्यानंतर या प्रकरणातील चोरट्यांनी पोलिसांना गुंगारा देत परराज्यात पळ ठोकला होता. अखेर या संशयित आरोपींना चार महिन्यानंतर झारखंड राज्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष बाब म्हणजे हे आरोपी बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी विशेष पथक नेमून त्यांना बेड्या ठोकल्या आहे.लुटू जमीदार शेख आणि असरुद्दीन मुस्ताक शेख झारखंड असे पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या आरोपींकडून गुन्हातील चोरीला गेलेल्या मोबईल पैकी 2 मोबाईल सापडून आले आहे. तर उर्वरित मोबाईलचा शोध पोलीस घेत आहे. पोलिसांनी या संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करुन पुढील तपास सुरू केला आहे. ही कारवाई गोंदियाचे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा,आमगांव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, आमगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युवराज हांडे आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post