गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघा करीता नेते भरणार आज नामांकन..

 




गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा. अशोक नेते आज (दि.२६) लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, आ.डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, आ. बंटी भांगडिया, माजी आमदार अतुल देशकर, माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम, माजी आमदार संजय पुराम, माजी आमदार केशवराव मानकर, माजी आमदार भैरसिंगजी नागपुरे, लोकसभा संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर माजी. जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, यांच्यासह महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहतील.सकाळी ११ वाजता खा. नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालया पर्यत रॅली काढली जाईल. केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आणण्यासाठी आणि महायुतीच्या विजयाचा संकल्प करत ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नामांकन दाखल केले जाणार आहे.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हाध्यक्ष अॅड. येशूलाल उपराडे, जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार, डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदाताई कोडवते, डॉ. मिलिंद नरोटे, डॉ. शामजी हटवादे, संजय गजपुरे, भारत खटी, प्रणय खुणे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सदानंद कुथे, गोविंद सारडा, योगिता पिपरे, किसान आघाडीचे रमेश भूरसे, जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, आशिष पिपरे, अरूण हरडे, यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील.

Post a Comment

Previous Post Next Post