आमगाव नगर परिषद ची निवडणुका लवकर घेण्यात यावी - सहसराम कोरोटे
गेल्या अनेक वर्षापासून आमगाव नगर परिषद येथे प्रशासकीय राजवट सूरू असल्याने सर्व सामान्य जनतेची होणारी गैरसोय थांबण्या करीता आमगाव नगरपरिषद येथे निवडणुका व्हायला हवी या विषयावर आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी पावसाळी अधिवेशनात दि 09/जुलाई/2024 ला विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमगाव नगर परिषदची निवडणूक लवकरात लवकर घेण्यात यावी व त्या 8 गावांना न्याय कधी मिळणार या आश्याचे फलक हातात घेत सभेचे व संपुर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे