स्थानिक स्वराज स्वांस्थेंच्या निवडणूकीत युवकांना नेतृत्व देऊ - तीरथ येटरे
दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी आमगाव येथील राजवाडा पॅलेस येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्ष जिल्ह्याचे महासचिव तिरथ येटरे होते. बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष बालू वंजारी, तालुकाध्यक्ष भूमेश शेंडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.बैठकीत प्रामुख्याने तालुक्याचे उपाध्यक्ष राजकुमार लाडसे, तालुका युवा अध्यक्ष अंकुश शिवणकर, युवा सचिव सौरभ ब्राह्मणकर, शहर सचिव मुनेश भाऊ पंचेश्वर, ओबीसी सेलचे अध्यक्ष हितेश सोनवणे, तालुका संघटक विनीत भौतिक, रवी शेंद्रे, हिमालय येळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष अनिताताई ठाकरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.मा. शरदचंद्र पवार आणि पुरोगामी विचारांशी प्रेरित होऊन माजी उपसंरपच इंद्रपालजी कटरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांनी पक्षप्रवेश केला. यामध्ये व्यंकट मानकर, प्राध्यापक नितेश खुशालजी मेश्राम, आदित्य हाडगे, राजेंद्र शेंडे (राजा), आमिर खान, प्राध्यापक संतोष मेश्राम, नरेंद्र जिंदाकूर, दीपक सरनागत, श्रावण उके, मोहतसीन खान, नीरज वैरागडे, मनोज मच्छीरके, गेंदलाल भगत, राजेंद्र दमाहे, विजय नेवारे यांचा समावेश होता.तालुकाध्यक्ष भूमेश शेंडे यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले की, येणाऱ्या काळात पक्ष अधिक बळकट होईल आणि शरदचंद्र पवार यांचा पुरोगामी विचार गावागावात पोहोचवू. जिल्हा उपाध्यक्ष बालू वंजारी यांनी जनसामान्यांचे काम कुठलाही भेदभाव न करता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.जिल्हा महासचिव तिरथ येटरे यांनी शरद पवार साहेबांनी पुणे आणि नागपूर येथील एमआयडीसी उभारण्याचे काम, युवकांना रोजगार देण्याचे काम आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी यांची आठवण करून दिली. तसेच स्थानिक निवडणुकीत युवकांच्या सहकार्याने जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट येणाऱ्या काळात आमगाव तालुक्यात आणि विधानसभा क्षेत्रात अधिक प्रभावीपणे काम करेल असे त्यांनी सांगितले.