शंकर मडावी यांनी उपोषण स्थळी दिली भेट .
धानोली व ८-९ गावातील ग्रामस्थांनी धानोली ते बाम्हणी रस्ता बनविण्यासाठी गेल्या काही दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. गावकऱ्यांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी शंकर मडावी यांनी उपोषण स्थळी भेट दिली. त्यांनी उपोषणकर्त्यांसमोर तहसीलदार सालेकसा, ठाणेदार सालेकसा, जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी, आमदार परिणय फुके यांचे पीए तसेच माजी खासदार अशोक नेते यांना मोबाइलद्वारे स्पीकरवर बोलण्याची व्यवस्था केली आणि समस्या मांडली.उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार रस्ता बांधकामातील अडचण सोडविण्यासाठी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांना तात्काळ उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली. तसेच, उद्या पर्यंत या प्रश्नावर तोडगा काढण्यात यावा व उपोषणकर्त्यांना याची माहिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.