आमगाव विधानसभा मतदारसंघात 3.91 कोटींचे सोने जप्त



 66 - आमगाव विधानसभा मतदारसंघात 3.91 कोटींचे सोने जप्त

आमगाव, 19 ऑक्टोबर 2024: आमगाव तालुक्यातील FST (फ्लाईंग स्क्वाड टीम) आणि SST (स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम) पथकांनी आज संयुक्त कार्यवाही करत आमगाव-लांजी बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात सोने जप्त केले आहे. वाहन क्रमांक CG04N2876 मधून सुमारे 7.892 किलोग्रॅम सोने, ज्याची अंदाजे किंमत 3 कोटी 91 लाख रुपये आहे, जप्त करण्यात आले.ही कार्यवाही तहसीलदार, आमगाव आणि ठाणेदार, आमगाव पोलिस स्टेशन यांच्या निगराणीखाली करण्यात आली. जप्त केलेला मुद्देमाल आमगाव पोलिस ठाण्यात पंचनामा करून सीलबंद करण्यात आला आहे. पुढील सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत हा मुद्देमाल जिल्हा कोषागार कार्यालय, गोंदिया यांचे अभिरक्षेत ठेवण्यात आला आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गोंदिया, पोलिस अधीक्षक, गोंदिया, उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही यशस्वीरीत्या पार पडली. जप्त केलेल्या मुद्देमालाची नोंद ESMS (इलेक्शन सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टीम) मध्ये करण्यात आली असून, त्याची तपासणी करून पुढील कारवाई भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात येईल.सदर प्रकरणामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, आमगाव विधानसभा आणि उपविभागीय अधिकारी, देवरी यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post