बुद्ध धम्मामुळे दलित स्वाभिमानाने जगतात: सुरेन्द्रकुमार खोब्रागडे
आमगाव: बूद्ध धम्म कुटी भवभूती नगर आमगांव येथे भारतीय बौद्ध महासभा (राजरत्न आंबेडकर) आणि भदंत अश्वघोष यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म चक्र प्रवर्तन व वर्षावास समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला. तालुक्यातील उपासक आणि उपासीकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी भदंत अश्वघोष यांनी महापरित्राण पाठ केला आणि धम्म देशना दिली. तसेच, चिवरदान समारंभाचाही यावेळी आयोजन करण्यात आला. कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा तालुका आमगांवचे अध्यक्ष सुरेन्द्रकुमार खोब्रागडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मामुळेच दलितांचे जीवनमान उंचावले असून, त्यातून दलित समाज आज स्वाभिमानाने जगत असल्याचे नमूद केले. त्यांनी मुलांना धम्म संस्कार देण्याचे आवाहन करत बाबासाहेबांना डोक्यावर नव्हे, तर डोक्यात ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट केले.कार्यक्रमानंतर उपस्थित उपासक आणि उपासीकांसाठी खीर वाटप व भोजनदान करण्यात आले.कार्यक्रमाला संगीता टेंभुर्णे, अॅड. रंजीता खोब्रागडे, निरू फुले, मालता कांबळे, शारदा कोटांगले, माया कांबळे, श्रद्धा शहारे, बिंदू शहारे, नितू शहारे यांसह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, महिला विंग, उपासक आणि उपासीकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.कार्यक्रमाचे संचालन सुधीर टेंभुर्णे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कल्पना खेमचंद शहारे यांनी केले.