रामटेक प्राथमिक आरोग्य केंद्र भंडारबोडी येथे
राष्ट्रीय जनस्वास्थ प्रशिक्षण आणि अनुसंसाधन संस्थान, मुंबई (भारत सरकार) येथील डिप्लोमा इन हेल्थ प्रमोशन एज्युकेशनच्या प्रशिक्षणार्थी द्वारे ग्रामस्थरावर सर्वेक्षण करण्यात आले सदर सर्वेक्षणाअंती या योजना बाबत व्यापतीची गरज असल्याचे आढळून आले त्याअनुषंगाने दि. 19 एप्रिल 2023 रोजी शिवनी गावातील नागरिकांसाठी शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम बाबत आरोग्य शिक्षण, पोस्टर प्रदर्शनीच्या व फ्लिपचार्टच्या माध्यमातून जनजागृती करणेत आली. शिविर मध्ये गरोदर माता,
स्तनदा माता, 0 ते 1 वर्षे वयोगटातील आजारी बालकांना कोणकोणत्या सोईसुविधा पुरवल्या जातात याबद्दल माहिती देण्यात आली. 102 या टोलफ्री क्रमांकावर कॉल करून मोफत रुग्णवाहिकेचा लाभ घेण्याबाबत आव्हाहन करणेत आले. सदर योजनेअंतर्गत उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मोफत आरोग्य तपासणी, प्रयोगशाळा व इतर तपासण्या, गरज असल्यास रक्त पुरवठा, औषधोपचार, मुकमादरम्यान मोफत आहार, ई.सुविधा पुरवल्या जातात. विविध पोस्टर्स द्वारे उपस्थितांना योजनेची तसेच इतर आरोग्य योजनेची सखोल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मा. डॉ. मडावी, संचालक डॉ. संजय चिलकर, डॉ. नंदेश्वर सहा. प्राध्यापक राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नागपूर, प्रमुख पाहुणे डॉ. अमोल आहे (CHMO) एन. आय. पी. एच. टी. आर. मुंबई, डॉ. नायकवार ता.आ.अधिकारी रामटेक, डॉ. एफ. एम शेख, डॉ. मेहरकुळे वै. अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र भंडारबोडी तसेच सर्व आरोग्य कर्मचारी व गावकरी उपस्थित होते. श्री सुनिल बी. मोरे यांनी संपूर्ण कार्यक्रम आयोजित करून मार्गदर्शन केले. डॉ. मरकाम वै. अधिकारी श्री. जुमडे आ. निरीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्र भंडारबोडी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.