वृत्त संकलन धीरज ठाकरे
रामटेक प्राथमिक आरोग्य केंद्र भंडारबोडी येथे राष्ट्रीय जनस्वास्थ प्रशिक्षण आणि अनुसंसाधन संस्थान, मुंबई (भारत सरकार) येथील डिप्लोमा इन हेल्थ प्रमोशन एज्युकेशनच्या प्रशिक्षणार्थी द्वारे दि.19 एप्रिल रोजी भंडारबोडी गावातील नागरिकांसाठी सिकलसेल तपासणी शिबिर, आरोग्य शिक्षण व पोस्टर प्रदर्शनीच्या माध्यमातून जनजागृती करणेत आली. सदर शिविरा मध्ये 0 ते 30 वयोगटातील 64 रुग्णांची सिकलसेल तपासणी करणेत आली. आरोग्य शिक्षणामध्ये सिकलसेल म्हणजे काय? त्याचे प्रकार (AS, SS) व घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन करणेत आले. तसेच लग्नापूर्वी सिकलसेल तपासणी करूनच लग्नाचा निर्णय घ्यावा जनेकरून लग्नानंतर होणाऱ्या बाळाला धोका निर्माण होऊन गुंतागुंत होणार नाही असे आवाहन करणेत आले. प्रसुतीपूर्व सिकलसेल तपासणी करणेही गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. विविध पोस्टर्स द्वारे नागरिकांना सिकलसेल आजाराबाबत इत्यंभूत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मा. डॉ. मडावी, संचालक, डॉ. संजय चिलकर, डॉ. नंदेश्वर सहा. प्राध्यापक, राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अमोल आडे, (CMHO) एन. आय. पी. एच. टी. आर. मुंबई, डॉ. नायकवार ता. आ. अधिकारी, रामटेक, डॉ. एफ. एम शेख, डॉ. मेहरकुळे वै. अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र भंडारबोडी तसेच सर्व आरोग्य कर्मचारी व गावकरी उपस्थि
त होते. श्री. शैलेंद्र सी. झाडे यांनी संपूर्ण कार्यक्रम आयोजित करून मार्गदर्शन केले. डॉ. मरकाम वै. अधिकारी, श्री. जुमडे आ. निरीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्र भंडारवाडी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला
.