विज पडुन वैरन, पाईप जळुन खाक..



 


  किनवट प्रतिनीधी.. प्रमोद जाधव.


ईस्लापूर भागात आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह गाराचा पाऊस झाल्याने येथुन जवळचं असलेल्या मुळझरा ,येथील शेतकरी पंडित माधवराव चव्हाण, यांच्या शेतात वैरनाच्या गंजीवर विज पडल्याने गंजीला आगल्याने वैरन जळुन खाक झाले त्याच सोबत जवळचं झाडाला लाऊन ठेवलेले स्पिंकलर पाईप , सुध्दा जळाले. सदरील घटनेत शेतकऱ्याचे चाळीस ते पंन्नास हजाराचे नुकसान झाल्याची माहीती आहे..मळझरा,येथील शेतकऱ्यानी उन्हाळ्यात जनावरांना खाण्यासाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी त्यांनी आपल्या शेतात लिंबाच्या झाडाखाली ७०० ते ८०० पेंढी वैरन ( कडबा )जमा केले होते . रब्बी हंगाम संपल्याने शेतातील दोन स्पिंकलर सेट पाईप त्याठिकाणी जमा केले होते, दुपारी दोन च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाल्या पावसामुळे सदरील शेतकऱ्याच्या गवताच्या गंजीवर विज कोसळल्याने लागलेल्या आगित वैरन आणि पाईप जळून खाक झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post