माजी उमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती.
जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी, शेतकरी-शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व महिलांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या व त्यांच्यावर शासन-प्रशासनाकडून होणा-या अत्याचाराला वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी जनसेवेचे ब्रीद घेऊन संपादक सुमित ठाकरे यांनी माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क या नावाचं YouTube वाहनी व न्युज पोर्टल सुरू केले आहे. एल्गार परिषद निमीत्त महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ना छगन भुजबळ यांचा उपस्थितीत माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, न्युज पोर्टल चा लोकार्पण दी 23/04/2023 ला गोंदिया जिल्ह्यातील ग्राम परर्सोडी येथे लोकार्पण सोहळा आयोजित केला होता व खालील मान्यवरांच्या उपस्थित त्यांच्याच हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाला व या कार्यक्रमात माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क उपसंपादक धीरज ठाकरे, बालू वंजारी, महाराष्ट्र राज्य ओबीसी क्रांती दल प्रदेश अध्यक्ष राजेंद्र महाडोळे, स्थानिक आमदार मनोहर चांद्रिकापुरे देविदासजी गुरनुले ,प्रवीण पेटकर राजेंद्रजी मांदाडे, अमोल गुरनुले, रविंद्र येटरे, मुनेश पांचेश्वर,राहुल चोरवाडे, शारदा ताई भासे हे प्रामुख्याने उपस्थित होते.