बातमी संकलन धीरज ठाकरे
तिरोडा
केंद्र शासनाच्या योजना शहरासोबतच ग्रामीण भागाच्या उत्थानासाठीचा महत्त्वाचा मार्ग ठरीत आहे. या योजनांच्या माध्यमातून होत असलेले परिवर्तन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख दृष्टीकोणाची साक्ष देते, असे मत खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले.
काही दिवसांपूर्वी खासदार सुनील मुंडे यांच्या पुढाकारातून केंद्र सरकारचा सामाजिक न्याय मंत्रालय आणि एआयडीपी विभागाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींची मूल्यांकन करण्यात आले होते. या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना लागणाऱ्या साहित्यासाठी त्यांची निवड केली गेली होती. अशा निवड झालेल्या दिव्यांगांना निशुल्क साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज तिरोडा पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आला. खासदार सुनील मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात तिरोडा शहर आणि ग्रामीण भागातील निवड झालेल्या विविध लाभार्थ्यांना कर्णयंत्रापासून ते तीन चाकी सायकल पर्यंत साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना खासदार सुनील मेंढे यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. आज देशभरातील असंख्य शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपयांचे अनुदान टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले असे ते म्हणाले. ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या योजना मोदी सरकारने अमलात आणल्या. दिव्यांग म्हणविणाऱ्यांनाही त्यांच्या पायावर उभे होऊन सर्वसामान्य लोकांप्रमाणे वावरता यावे यासाठी मोफत साहित्य वाटपाची योजना अत्यंत महत्त्वाची ठरित असल्याचे ते म्हणाले. पात्र ठरूनही या शिबिरात ज्या लाभार्थ्यांचे साहित्य आले नसेल, ते त्यांच्या घरोच पोहोचविण्याची व्यवस्था केली जाईल, असे सांगून शेवटचा लाभार्थी समाधानी होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जनता दरबारात ऐकली गाऱ्हाणी- साहित्य वाटप कार्यक्रमाच्या आधी तालुक्यातून आलेल्या शेकडो नागरिकांच्या अडीअडचणी आणि समस्या ऐकून घेतल्या. काही समस्या निकाली काढण्याच्या दृष्टीने
तात्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर काहींच्या बाबतीत ताबडतोब तोडगा काढण्याची निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी सर्वश्री ओमभाऊ कटरे जिल्हाध्यक्ष भाजमूयो, बाळूभाऊ बावनथडे जिल्हा परिषद सदस्य, सौ.कुंताताई पटले सभापती, श्री.हुपराजजी जमैवार उपसभापती, सौ.कविता सोनवणे सदस्या पं.स, सौ.दिपाली टेंभेकर, सौ.ज्योती शरणागत, सौ.प्रमिला भलाई, सौ.सुनंदा पटले, श्री.चैतलाल जी भगत व अन्य मान्यवर उपस्थित होते.