आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची या वर्षी सुद्धा उत्कृष्ट निकाल ची परंपरा कायम..


🏆🏆आयुष डोंगरे जिल्ह्यात प्रथम🏆🏆


आदर्श विद्यालय चा एकूण निकाल ९९.४७ टक्के


 महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल गुरूवारी दि. २५ /०५/२०२३ ला जाहीर करण्यात आला. दरवर्षी निकालात आघाडी घेणारा आदर्श कनिष्ठ महाविद्यालय यंदाही आघाडीवर होता. जिल्ह्यात आघाडीवर असून या आदर्श कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आयुष विनयकुमार डोंगरे हा विज्ञान शाखेतून ९५.१७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. तर याच महाविद्यालयातील वेदांश पंकज कुमार गुप्ता याने ९२.१७ टक्के गुण घेऊन तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. कु चेतना लखनसिंग परिहार हिने ८५.३३% गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला. तर कला शाखेतून कु शितल गंगाधर शिदाने ही ८५.८३ गुण घेऊन तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात व्दितीय स्थान मिळविला आहे. तर कु निकिता अशोक बर्वे हिने ७६.३३% गुण घेऊन तालुक्यात द्वितीय व कु खुशी राजेश तलमले हिने ६२.१७ टक्के गुण घेऊन महाविद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला आहे. भवभूती शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सुरेशबाबू असाटी, सचिव माजी आमदार केशवराव मानकर, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार यांनी अभिनंदन केले आहे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डी एम राऊत यांनी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रावीन्यप्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य,सर्व शिक्षकवृंद यांना दिले.

Post a Comment

Previous Post Next Post