राष्ट्रवादी पक्षाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या सुपुत्रासह 15 नगराध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश !





अर्जुनी मोरगाव विधान सभा ६३ क्षेत्राचे आणि राष्ट्रवादि पक्षाचे सध्याचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांनी सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोर येथील नगर अध्यक्ष आणि सदस्यांसह शिवसेना शिंदे गटात 20 ते 25 लोकांनी आज पक्ष प्रवेश केल्याचे खळबळ जनक वृत्त समोर आले आहे.सडक अर्जुनी नगर पंचायत मध्ये शिव सेना, काँग्रेस, भाजप राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आहेत. अश्यात भाजप सोडून सर्व पक्षाचे पदाधिकारी शिव सेना पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.शिव सेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला आहे. यात सडक अर्जुनी नगर पंचायत चे नगर अध्यक्ष रा मळावी, 2) उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, 3) बांधकाम सभापती अंकित भेंडारकर, 4) माजी बांधकाम सभापती महेंद्र वंजारी, 5) पाणी पुरवठा सभापती साईस्ता मतीन शेख, 6) दीक्षा राजकुमार भगत महिला बाल कल्याण सभापती, 7) माजी नगर अध्यक्ष देवचंद तरोने, 8) माजी नगर अध्यक्ष ससिकला टेंभुर्णे, 9) नगर सेवक गोपीचंद खेडकर, 10) नगर सेवक अशलेस अंबादे, 11) नगर सेवक तायमा जुबेर शेख, 12) नगर सेवक कामिनी कोवे, 13) दिलीप गभने माजी नगसेवक, 14) धनवंत कोवे, 15) विदेश टेंभुर्ने, 16) मतीन शेख अश्या एकूण 16 लोकांनी पक्ष प्रवेश केला आहे.तर अर्जुनी मोरगाव नगर पंचायत चे नगर अध्यक्षा आणि बांधकाम सभापती व नगर सेवक अश्या एकूण 5 लोकांनी देखील आज पक्ष प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत 21 लोकांनी राष्ट्रवादि पक्षाला रामराम ठोकत शिव सेना शिंदे गटात आज प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे. या पक्ष प्रवेश मध्ये राष्ट्रवादि पक्षाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र डॉक्टर सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांचा समावेश आहे. ते काही दिवसा पूर्वी भाजप च्या वाटेवर होते. मात्र अचानक शेना पक्षात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.महापालिका निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच राष्ट्रवादीला जबरदस्त खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादीचे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील नगराध्यक्षासह नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांच्या अंगावर भगवा शेला टाक त्यांना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची गोंदियातील ताकद वाढली आहे. तर राष्ट्रवादीला गोंदियात मोठा फटका बसला आहे. यावेळी महिला कार्यकर्त्याही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद घे यांच्या नावाने जयघोष केला. या पक्षप्रवेशामुळे गोंदियात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post