वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे अतोनात नुकसान



*आमदार कोरोटे यांची जामखारी गावाला भेट व तहसीलदारांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश*



आमगाव प्रतिनिधी:- धीरज ठाकरे 

तालुक्यातील काही गावांमधून शनीवारी ता. २७


सायंकाळी आलेल्या अवघ्या वीस मिनीटाच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक घराचे नुकसान तसेच शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हाती आलेला घास हिरावल्या शेतकरी अडचणीत सापडले आहेत.वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच बिरसी, जामखरी येथे शेड उडाल्याने अनेक घरांचे नुकसान झाले असून एक मुलगा जखमी झाला आहे. 
का



ल अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील जामखरी या गावाला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असून शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले हे माहिती पडतात खामगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी जामखारी या गावाला भेट दिली असून तहसीलदारांना लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी आमगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष संजय बहेकार, जिल्हा परिषद सदस्य छबुताई उके, पंचायत समिती सदस्य नंदकिशोर कोरे, नायब तहसीलदार सतीश वेलादी राधाकिसन चुटे, महेश उके, भैय्यालाल बावनकर तसेच मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post