दिनांक 05/05/2023 ला ग्राम बोथली येथे बुद्ध जयंती समारोह संघमित्रा महिला समिती बोथली येथे आयोजित केला होता .या कार्यक्रमांमध्ये शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून श्री राजेन्द्र धर्मदास बंसोड आदर्श शिक्षक यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भीमराव राऊत सर संत जय रामदास विद्यालय ठाणा, प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती छबुताई उके जिल्हा परिषद सदस्य गोंदिया, श्री नंदू भाऊ कोरे पंचायत समिती सदस्य आमगाव, मा. सिद्धार्थ डोंगरे सर, संत जय रामदास विद्यालय ठाणा, उषाताई सुभाषजी चुटे सरपंचा ग्रामपंचायत बोथली, श्री देवा भाऊ फुंडे उपसरपंच ग्रामपंचायत बोथली , श्री.आशिष भांडारकर , मीनाक्षीताई महारवाडे,सुनीताताई कापसे, कांताताई कोटांगले ,सीमाताई पाथोडे ,उषाताई गिऱ्हेपुंजे, केदारनाथ गिऱ्हेपुंजे सदस्य ग्रा. पं. बोथली,मा. तेजरामजी डोंगरे अध्यक्ष पंचशील नवनिर्मित समिती बोथली, श्रीमती वर्षा भिमटे अध्यक्ष संघमित्रा महिला समिती बोथली, श्री.भरतजी भांडारकर अध्यक्ष तंटामुक्त समिती बोथली,श्रीमती सरिता नंदेश्वर, सरिताराहुलकर ,मा.नानिकरामजी डोंगरे ,मूलचंदजी कांबळे ,वासुदेवजी डोंगरे,बाळकृष्ण जी राहुलकर स्त, विलास डोंगरे सर, समस्त गावकरी बांधव व भगिनी यांच्या उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम पार पडला. धम्मचारी अनोम कुमार त्रिरत्न बौद्ध महासंघ देवरी यांनी बुद्ध धम्म आणि आपले आचरण याविषयी सखोल धम्मोपदेशना दिली. धम्मचारी निर्मलज्ञान त्रिरत्न बौद्ध महासंघ आमगाव यांनी सुद्धा बुद्ध धम्मावर सखोल चिंतन आणि मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विधी गणवीर हिने केले.