दिवासी हलबा कुटुंबातील खेडेगावात शिक्षण घेतलेले व बालपणापासून समाज कार्याची मनीषा बागळुन आदिवासी गरजू वंचित अनाथ जनसामान्य जणांच्या मदतीला धावून जाणारे आमगाव तालुक्यातील आदिवासी भागात आपली ओळख निर्माण करणारे डॉक्टर श्रीकांत श्रावण राणे आदिवासींसाठी देवदूत ठरत आहेत.कधीही पैशांची अपेक्षा न करता समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांची सेवा करणे, हा डॉ. श्रीकांत राणे (राणा) यांचा मुख्य उद्देश असतो. डॉ श्रीकांत राणे हे दंत चिकित्सक असून आजच्या घडीला युवा वर्ग हा तोंडाच्या कर्करोगाला सामोरे जात आहे. या करिता डॉ श्रीकांत राणे खूप मोठं अभिमान राबवून जनजागृती करीत आहेत. तसेच आलेल्या प्रत्येक रुग्णांना आपुलकीने वागविणे, त्याचा आजार समजावून घेऊन सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे निदान करणे आणि आजार समूळ नष्ट करणे हा एकमेव उद्देश असलेले डॉ. श्रीकांत राणे गेले दहा वर्षे सातत्याने रुग्णांची सेवा करत आहेत. व कर्करोगाबाबत जनजागृती करीत आहेत. कुटुंबातील जबाबदारी सांभाळीत व शासकीय नोकरीतून
वेळ काढून त्यांच्या पत्नी डॉ. स्मृती कर्मचाऱ्यांच्या श्रीकांत राणे हे सुद्धा सामाजिक कार्यात सहकार्य करतात. प्राथमिक आरोग्य केंद्र तिगाव येथे वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ स्मृती राणे हे आरोग्य शिबिरात मोलाचे सहकार्य करतात. आरोग्य भारती गोंदिया जिल्हा सचिव व आमगाव तालुका अध्यक्ष पदभार हाती घेताच आमगाव, देवरी, सालेकसा तालुक्यातील आदिवासी बाहुल भागात रुग्णांसाठी 'आरोग्य विषयक व कर्करोग जनजागृती शिबिरे आयोजित केली,
अशी आरोग्य विषयक लोकोपयोगी शिबिर घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. अत्यल्प खर्चात उपचार करण्याचे ध्येय ठेवूनच त्यांनी रुग्णसेवा केली. सामाजिक कार्यातही त्यांचे फार मोठे योगदान आहे.स्वखर्चाने गरिब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, करिअर गाइडन्स मार्गदर्शन शिबीर आयोजित करून युवा वर्गाला मार्गदर्शन करणे अशी त्यांच्या कामांची यादी मोठी आहे. एवढेच नव्हे तर आदिवासी समस्या मार्गी लावण्यासाठी नेहमीच धडपड सुरू असते. काम करण्याची चिकाटी बघून आदिवासी बांधवांनी हलबा हलबी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. आदिवासी समाजातील व इतर गरजूंना उदार मनाने मदत करणारे व सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून ओळख निर्माण केलेल्या डॉ. श्रीकांत राणे यांना ग्लोबल इंटरनेश
नल फाउंडेशन टीम नागपूर च्या वतीने डिसेंबर २०१२ ला सामाजिक कार्यात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या धडधडत्या कार्यप्रणालीने आदिवासी समाज बांधवांसाठी देवदूत ठरत आहेत, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.