🐯🐯शेतकऱ्यांना दहशतमुक्त शेती करू द्या🐯🐯

 


🐯🐯🐯 शेतकरी शेतमजूर एल्गार परिषदेचा शासनाला इशारा 🐯🐯🐯



विनोद इंगळे ( यवतमाळ )


      शेतकरी शेतमजुर एल्गार परिषदेच्या वतीने दिनांक 19/06/2023 रोजी विद्यमान जिल्हाधिकारी  यवतमाळ यांना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन सादर केले असून यवतमाळ जिल्ह्याला लागून असणारा राष्ट्रीय अभयारण्याला लागून असणाऱ्या गावांमध्ये वाघांचा प्रचंड धुमाकूळ आहे व वाघांच्या या धुमाकूळ मुळे प्रत्येक गावात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे हया महिना पासून शेतीचे काम सुरू होत असून शेतकरी शेतमजुरांना शेतामध्ये जाणे आता कठीण झालेले आहे .शेतकरी शेतमजूर अतिशय दहशतीच्या वातावरणामध्ये शेती करण्यासाठी जात आहे .आतापर्यंत वाघाने अनेक लोकांचे बळी घेतले असून त्यांना अल्पशा नुकसान भरपाई देवून त्यांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे आता वाघाच्या हलल्यात हत्या झालेल्या कुटुंबाला 1 कोटी रू., व कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत समाविष्ट करावे.वाघाच्या हल्ल्यात जखमी आलेल्या व्यक्तीला 25 लाख रु. नुकसान भरपाई द्यावी .राष्ट्रीय अभ्यरण्या मुळे होणाऱ्या त्रासाला नुकसान भरपाई म्हणून 2 लाख रु एकरी द्यावे . अजूनही वाघांच्या माध्यमातून माणसांच्या हत्याकांडाचे सत्र सातत्याने सुरू आहे .तेव्हा ते त्वरित थांबवावे , शेतकऱ्यांचे ढोर जंगलात गेले तर त्याच्यावर वनविभाग गुन्हे दाखल करतात मग वनविभगाचे ढोर (वाघ) शेतकरी शेतमजूर, गावकऱ्यांची हत्या करते तेव्हा वनविभागा वर सुध्दा गुन्हे दाखल करावे. शेतकऱ्यांना प्रति एकर 10000 रू लागवडीचा खर्च द्यावा., शेतकरी व शेतमजूर ना पेन्शन लागू करावी., प्रत्येक गावात धान्य साठविण्यासाठी गोडवून ची व्यवस्था करावी.,अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना कायदेशीर पट्टे देण्यात यावे.,अशा विविध मागण्या घेवून शेतकरी शेतमजूर एल्गार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अड. राजेंद्र महाडोळे ,.विठ्ठलराव नागतोडे ,प्रकाश जाणकार, पांडुरंग दिडपाये, राहुल हरसुले,डॉ. शिरभाते जितेंद्र हिंगासपुरे, अरुण कपिले ,सुनयना आजाद राहुल पाटील ,उत्तम खंदारे ,विवेक डेहनकर, जिनेंद्र ब्रह्मनकर, नितीन महाडोळे, अशोक तिखे, अतुल सांरडे, संजय येवतकर, महादेवराव बुटे,नरेश बोबडे,प्रफुल कोठेकर,इत्यादी अनेक पदाधिकारी यांनी निवेदन देवून शासन दरबारी मागणी केली आहे .जर शासन याकडे लक्ष देत नसेल तर उपरोक्त मागण्यांसाठी तीव्र आंदोलन कण्याची भूमिका घेतली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post