🏥🏥 तिरोडा तालुक्यातील मेंढा येथील आरोग्य वर्धिनी उपकेंद्राच्या उद्घाटनाचा मुहूर्त शेवटी सरपंचांनीच काढला... विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
दुर्योधन नाग्रिकर (गोंदिया)
तिरोडा : तालुक्यात अनेक इमारती बनून तयार आहेत. मात्र त्यांच्या उद्घाटनाची प्रतीक्षा संपेल अशी स्थिती आहे. त्यामुळे इमारतींपासून मिळणाऱ्या सुविधांपासून लोक वंचित आहेत. यातूनच अनेक ठिकाणी लोकं शासन- प्रशासन विरोधात संताप व्यक्त करीत असतात. तालुक्यातील ग्राम मेंढा आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या इमारतीचे उदघाटन करण्यासाठी आरोग्य विभागाला लोकप्रतिनिधींची तारीख घेण्यासाठी दोन वर्षांपासून हेलपाटे खावे लागत आहे. अशात गावातील सरपंचांनी स्वतः उदघाटनाचा मुहूर्त काढला व शेवटी त्यांनी ठरवलेल्या दिवशी लोकप्रतिनिधी उदघाटनाला धावून आले.
आज रविवारी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मेंढा येथे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे, तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले तसेच मेंढा गावच्या प्रथम नागरिक संगीता सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन देखील करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी भजनदास वैद्य, यशवंत गणवीर, रजनीताई कुंभरे, जगदीश बावनथळे, कुंताताई पटले, हुपराजजी जमाईवार, विजय बिंजाडे, गजानन कोकुडे, सतीश लिल्लारे, आर.जी. मून मदन पटले, नितीन कापसे, जितेंद्र रहांगडाले, स्वाती घोरमोडे, मिलिंद कुंभरे, रामु ठाकूर, गिरधारी कोसरकर, त्रिमूर्ती भोंडे, दीपक राऊत, रवींद्र कटरे, तेजस्विनी मेश्राम, रत्नमाला पटले, शोभा बोरकर, लेखमती येळे, गौरीशंकर टेंभरे, शंखपाल टेंभरे, अविनाश नागदेवे, तालिक टेंभरे, रतन खोब्रागडे, नंदेश्वरी बिसेन यासह मेंढा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.