पावसाने केला नगर परिषद व्यवस्थेचा पर्दाफाश

 पावसाने पाणी निचरा व्यवस्थेचा केला पर्दाफाश



🔶पहिल्याच पावसात नाले (Drain) तुंबले ...



🔶 नगर परिषदेचे ठप्प नालीकड़े (choke drain) दुर्लक्ष ...



सुमित ठाकरे (आमगांव)


गोंदिया जिल्ह्यातील आमगांव नगर परिषद अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी  संततधार पावसाने पाण्याचा निचरा व्यवस्थेचा पर्दाफाश झाला आहे. दि.२५ जून २०२३ रविवार रोजी रात्री उशिरापासून आज मंगळवार दुपारपर्यंत झालेला पाऊस पाणी ओसरण्यास कुचकामी ठरला आहे.



शहरातील अनेक रस्त्यांवर आणि परिसरात एक  ते दोन फूट पाणी साचले आहे. नगरपरिषद क्षेत्रातील किडंगीपार रोड, इंद्रप्रस्थ नगर ,यशवंत नगर, गोंदिया रोडवर यूपी सिटी, सहकार नगर, संकल्प नगर, मोदी रेसीडेंसी, बैंक कॉलोनी तील निकृष्ट दर्ज्याचे नवीन नालीकाम यासह शहरातील बहुतांश भागात पूरसदृश परिस्थिती दिसून आली. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

  


काही भागात लोक आपापल्या घरात कैद झाले. तर दुसरीकडे शहरातील विविध रस्ते व परिसरात पावसाचे पाणी साचले असून, रिमझिम पावसामुळे अनेक मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचे मोठे हाल होत आहेत. मुसळधार पावसानंतर या भागातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. रस्त्यावर आणि परिसरात तलावासारखे दृश्य पाहायला मिळत आहे. पाऊस सुरू झाल्याने हीच परिस्थिती राहिली, तर येत्या काही दिवसांत काय परिस्थिती असेल ?

नगर परिषदेने शहरातील विविध ठिकाणी पाहणी करून नाली तील झाड़े व केर कचरा ठप्प नालीची सफाई करावी असी शहरातील नागरिकांकडून मागणी केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post