आज दि. 27/06/2023 ला सकाळी 6.00 वा पुजारीटोला धरणाची* पाणी पातळी वाढत असल्यामुळे धरण सुस्थीतीत/ नियंत्रणाकरीता 02 गेट 0.30 मी. ने उघडण्यात आले आहे. यामधून 45.18 क्युमेक ( 1596 क्युसेक ) विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे तरी तरी नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्व संबंधीतानी स्वतः ची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा ईशारा देण्यात येत आहे. सोडण्यात आलेला विसर्ग सामान्य आहे नागरिकांनी कृपया नदीपात्र ओलांडू नये शेतीची अवजारे नदीपात्रात ठेवू नये जनावरांना नदीपात्र ओलांडू देऊ नये जलाशयात येणारा येवा पाहून विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो त्यामुळे नदीपात्राजवळ जाणे टाळावे.आजची जलाशय पातळी : 319.16 उपयुक्त पाणीसाठा :39.278 दलघमी उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी : 90.24% विसर्ग -45.18 cumec 1596 क्युसेक ) पर्यंत विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.