ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच जेव्हा सभेतून पळ काढले शेवटी ठाणेदार यांच्या उपस्थितीत पार पडली विशेष ग्रामसभा...

 ग्राम बाम्हणी येथील सभेत घडला अनोखा प्रकार, शेवटी ठाणेदार यांच्या उपस्थितीत पार पडली विशेष ग्रामसभा..




आमगाव : (6 जून 2023 ) तालुक्यातील ग्राम बाम्हणी येथे आखराचे सौंदर्यीकरण व साफसफाई करण्याच्या हेतूने अखिल भारतीय माळी महासंघ शाखा बाम्हणी, अखिल भारतीय बौद्ध महासंघ शाखा बाम्हणी व अखिल भारतीय गोंडवाना परिषद शाखा बाम्हणी यांच्या सयुंक्त मागणीने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, धरती पुत्र बिरसा मुंडा यांचे पूर्णाकृती पुतळे गावातील आखर असलेल्या ठिकाणी उभारण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. पण ग्रामसभेचे अध्यक्षच (सरपंच) सभेतून पळ काढण्याची घटना बाम्हणी येथे घडली.सविस्तर वृत्त असे कि, ग्राम बाम्हणी येथे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, धरती पुत्र बिरसा मुंडा यांचे पूर्णाकृती पुतळे गावातील आखर या ठिकाणी कोपऱ्यात एकाच ठिकाणी स्थापित करून आखराचे सौंदर्यीकरण करण्याचे दृष्टीने विशेष ग्रामसभेचे आयोजन दिनांक 5 जून 2023 ला करण्यात आले होते. सभेत वाद निर्माण होऊ शकतो या शंकेपोटी पोलीस प्रशासनाला सूचित करण्यात आले होते. 11 वाजेची सभा गणसंख्या पूर्ती करून सरपंच सुभाष थेर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ चित्रीकरणासहित सुरू झाली, सभेचा विषय ग्रामसभेचे मार्गदर्शक सौ. गौतम मॅडम ग्रामसेविका यांनी लोकांना प्रस्ताविकेतून समजावून सांगितले व सदर विषयावर चर्चा सुरू करण्यात आली. चर्चा सुरू असतांनी काहींनी विरोध दर्शविला तर 95% उपस्थित लोकांनी सदर जागेवर एकाच ठिकाणी महापुरुषांचे पुतळे प्रस्थापित झाल्यास गावात सामाजिक समता, एकता दिसून येईल असे म्हटले. सदर जागेच्या ठिकाणी पुतळे स्थापित करण्यासाठी मतदान घेण्यात यावे अशी उपस्थितांनी मागणी केली तेव्हा सभेच्या मार्गदर्शिका सौ गौतम मॅडम यांनीही मतदानाच्या मागणीला दुजोरा देत तशी अध्यक्षांना विनंती केल्यावर काही विरोधकांनी सभेत गोंधळ घालून सभा उलथावण्याचा प्रयत्न केला. यावेळी अध्यक्षानीच भर सभेतून पळ काढला. तेव्हा सभेतील उपस्थित ग्रामवासी आक्रमक झाले. सभेची परिस्थिती लक्षात घेता पुन्हा आमगाव वरून अतिरिक्त पोलीस बोलविण्यात आले. अध्यक्षांना पुन्हा बोलावून उपस्थितांनी मतदान घेण्याची मागणी केली पण त्यांनी ती धुळकावून लावली व पुन्हा सभेतून पळ काढला. त्यामुळे पुन्हा नागरिक संतप्त झाले. शेवटी आमगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना पाचारण करण्यात आले आले. सभेतील विषयाचे गांभीर्य व लोकांची मागणी लक्षात घेऊन ठाणेदारांनी अध्यक्ष व ग्रामसेविका यांच्याशी सल्ला मसलत करून शेवटी मतदान घेण्याच्या सूचना केल्या. मतदानात 167 पैकी 147 लोकांनी सदर ठरावाला संमती दर्शविली, उरलेले २० लोकं विरोध न करता तटस्थ राहिले. शेवटी सभेतील स्पष्ट बहुमत लक्षात घेता व ठाणेदार यांच्या सूचनेनुसार सदर जागेवर पुतळे स्थापित करण्यासाठी 2017 शासन परिपत्रकाचे पालन करून जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या परवानगीने सदर जागेवर पुतळे स्थापित केले जावे असा एकमताने ठराव पारित करण्यात आला. एकंदरीत हाई प्रोफाईल ग्रामसभेतून अध्यक्षांनीच पळ काढने हा चर्चेचा विषय ठरला.

Post a Comment

Previous Post Next Post