दि. ०७/०६/२०२३ ला तालुका कांग्रेस कमेटी आमगांव
द्वारे मा.जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया. मार्फत - मा.तहसीलदार तहसील कार्यालय आमगाव यांना आमगाव नगरपरिषद क्षेत्रातील आठ गावांमधील शासकीय जमिनीवर (आबादी अंतर्गत) बांधलेल्या घरांना कायमचे आखीव पत्रिका किंवा पट्टे देण्यात यावे व त्यांना या कारणामुळे कोणत्याही प्रकारचे शासकीय लाभ मिळत नाहीत, जसे घरकुलचा लाभ व नळाचे कनेक्शन मिळत नाहीत अशा प्रकारची चर्चा करून निवेदन पत्र देण्यात आला.निवेदन करतांनी मा.संजय श्यामराव बहेकार अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी आमगांव. मा.महेश उके सचिव काँग्रेस कमिटी आमगाव, मा.रामेश्वर श्यामकुवर अध्यक्ष अनु.जाती, मा.पिंकेश शेंडे अनु.जाती उपाध्यक्ष, शालिकजी पाथोडे काँग्रेस कार्यकर्ता, चैतरामजी देशकर काँग्रेस कार्यकर्ता, भरतजी बावनथडे काँग्रेस कार्यकर्ता, रीताताई संतोष मेंढे सरपंच महारीटोला, संतोषजी मेंढे काँग्रेस कार्यकर्ता, अनिलजी कठाने सदस्य माहारीटोला, निशांत मडामे जनसंपर्क कार्यालय आमगाव व अन्य कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.