ज्यांचा खाद्य वर अस्तो तालुका ची जवाबदारी त्यांचाच कार्यालयात अस्वच्छते चे साम्राज्य
बात्मी संकलन सुमीत ठाकरे (आमगांव)
आमगांव तालुक्यात स्वच्छ भारत अभियानांतर्गत लोकांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असतानाच आमगांव तहसील कार्यालयात मात्र स्वच्छता गृहात आरोग्याचे तीन तेरा वाजले आहेत. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तहसील कार्यालयात नेहमीच कामानिमित्त लोकांचा मोठचा प्रमाणात आवागमन असते. या कार्यालयाचे परिसर समोरच्या बाजूने साफसफाईने चकमकीत केला असला तरी मात्र, येथे कामानिमित्त येणाऱ्या लोकांसाठी शौचालय तशेच स्वच्छता गृहात गेल्यावर घाणीचे व दुर्गंधीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरल्याचे पाहायला मिळते. ग्रामीण भागातील व शहरी भागातील नागरिकांचा संबंध
थेट तहसील कार्यालयासीन येत असल्याने शेतकरी आपले शेती संबंधित दस्तावेज तयार करण्याकरिता कार्यालयात येत असतात तर महिलांचे संजय गांधी पेन्शन, वृद्धपकाळ पेन्शनची संबंध येत असल्याने त्यांचे तहसील कार्यालयात नेहमीच आवागमन होत राहते तशेच विविध प्रकारच्या दाखल्याच्या संबंधाने शालेय विद्यार्थी तहशील कार्यालयाला भेट द्यावे लागत असल्यामुळे तहसील कार्यालयात आवागमन करणाऱ्या लाभार्थ्यांना शौचालय व स्वच्छता गृह अस्वच्छ व दुर्गंधी असल्याने लघुशंका व शौचास जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याने आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. आमगांव तहसील कार्यालय येथील शौचालय तशेच स्वच्छता गृहाची स्वच्छता होते की नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. परिणामी अस्वच्छतेमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एकीकडे शासनाने स्वच्छ भारत मिशन अभियान सुरू करून लोकांचे आरोग्य सुधारण्यावर लक्ष देत आहे. मात्र, प्रशासनाच्या गैरसोयींमुळे शासकीय कार्यालयातच लोकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचे चित्र आमगांव तहसील कार्यालयात दिसत आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष घालून तात्काळ यावर कारवाई करून स्वच्छता गृह व शौचालय स्वच्छ करावे अशी मागणी खेड्यापाडयातून कार्यालयीन कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.