आमगांव येथे शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या फोटो ला जोडे मारून केले निषेध !
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारीत झाल्यानंतर राज्यभरात सर्वत्र आक्रोश पाहायला मिळत आहे. याबरोबरच आमगांवमध्ये देखील याचे पडसाद उमटले आहेत. ठाकरे गटाच्या संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून किरीट सोमय्याचा जाहीर निषेध करत जोडे मारो आंदोलन केले आणि पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन केले. जिल्हाप्रमुख शैलेश जयसवाल यांच्या नेतृत्वात हे निषेधात्मक आंदोलन करण्यात आले.स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात ठाकरे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन केले. नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर कायदेशीर कारवाईकरण्याची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.सभ्यता व सुसंस्कृतपणाचा आव आणून अनेक राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांचा खरा चेहरा अश्लील आक्षेपार्ह व्हिडिओने समोर आला असून अशा नग्न व अश्लीलतेचे प्रदर्शन मांडणाऱ्या सोमय्या यांचा शिवसेनेने निषेध करीत कारवाईची मागणी केली आहे.या आंदोलनात जिल्हा प्रमुख शैलेंश जयसवाल, उप जिल्हा सोहन सिरसागर, जिल्हा महिला आघाडी हेमलता चौहान,महिला आघाडी शहर नीलम अग्रवाल,ता प्रमुख किशोर कावड़े,शहर प्रमुख विकास शर्मा, जीतू पटले,कमलेश अग्रवाल, मनीराम फुनडे,लोकपाल पवार,लक्मन शेंडे,भारत पाथोडे,बंडू देशकर,राजा गुप्ता क्रूसना ,वैभव पारधी,धंनु शिवनकर, व आदि शिवसैनिक उपस्तिथ होते