🌿🌿 पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी गोंदिया जिल्ह्याचे नाव लौकिक केले.- जयश्री पुंडकर🌿🌿
भारत सरकार गृहमंत्रालयाकडून विदर्भातील एकमेव पोलीस स्टेशन अर्जुनी मोर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून निवड करण्यात आली.कायदा सुव्यवस्था , गुन्हेगारी प्रतिबंध दोष सिद्धी यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. अर्जुनी मोर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून निवड झाली त्यावेळी कार्यरत असलेले गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील कर्तव्यदक्ष , नेतृत्व गुण संपन्न असलेले पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी. आणि सहा.पो. नि.सोमनाथ कदम , सहा.पो.नि. विलास नाडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या व पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनामध्ये कार्य करून राज्यस्तरावर गोंदिया जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे अशा शब्दात जयश्री पुंडकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त करून त्यांचे गौरव केले.सूर्यवंशी यांचा हा सत्कार जयश्री पुंडकर जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन करण्यात आले तसेच केशोरी पोलीस स्टेशन चे अधिकारी सोमनाथ कदम , अर्जुनी मोर चे अधिकारी विलास नाडे यांचेही सत्कार व अभिनंदन करण्यात आले यावेळी जिल्हा सचिव वंदना बैस ओम पारधी सुनंदा येरणे तालुकाध्यक्ष आमगाव शोभा डोये अतुल फुलंके आदी उपस्थितीत होते. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनात संघटना पोलीस व पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभी राहून कार्य करीत राहील.