मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आमगावं - देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी आमगावं ते सालेकसा या राज्य महामार्ग वर असलेले आमगांव वरुन काही अंतरावर असलेला बाघनदी वरील जिर्ण झालेले पुल भविष्यात कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या पुलाची दुरूस्ती तत्काळ करण्याची मागणी आमदार कोरोटे यांनी आज शुक्रवारी (ता. २१ जुलै) रोजी पावसाळी अधिवेशनात प्रश्नाच्या माध्यमातून केली आहे.