🍁🍁अखेर तोच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आमगावच्या संचालक पदी कायम🍁🍁
गोंदिया /सुमीत ठाकरे
गोंदिया जिल्ह्यातील नुक्त्याच पार पडलेल्या एप्रिल 2023 मध्ये आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संपन्न झालेल्या निवडणुकीत भूपेश बन्सीधर अग्रवाल यांची निवड झाली होती. परंतु भूपेश बन्सीधर अग्रवाल यांची निवडणूक ही बेकायदेशीर असल्याचे सुभाष गोविंदराव आकरे (अर्जदार)यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक नियम 207 कलम 10 प्रमाणे ते अपात्र अपात्र असल्यामुळे त्यांना संचालक पदावरून कमी करण्यात यावे यासाठी माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया यांच्याकडे अर्ज दाखल केले.
अर्जात त्यांनी भूपेश बंसीधर अग्रवाल (ग़ैरअर्जदार)हे शेतकरी नसून भात गीरणीचे मालक आहेत, तसेच ते अविभक्त हिंदू कुटुंबातून येत असल्याने त्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव च्या संचालक पदावरून अपात्र करण्यात यावे असे अर्जात नमूद केले. त्यावर मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून भूपेश बंशीधर अग्रवाल यांना संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव या पदावर कायम करण्याचे आदेश दिले व सुभाष गोविंदराव आकरे यांचे अर्ज फेटाळून लावला.
अर्जदार तर्फे स्वतः सुभाष गोविंदराव आखरे यांनी आपली बाजू मांडली व गैरअर्जदार भूपेश बन्सीधर अग्रवाल यांच्यावतीने अँड. लखनसिंह कटरे यांनी बाजू मांडली.