३० फूट खोल विहिरीत अडकलेला सापला दिले जीवनदान ..
बात्मी संकलन बालू वंजारी
आज ९ जुलै २०२३ रविवारला, लांजी रोड वरील श्रीरामटोली (म्हाली) आमगाव इथे *मंगलमूर्ती चूटे* यांच्या चार महिन्यापासून कोरड्या ३० फूट खोल विहिरीत*, पावसामुळे ५-६ फूट पाणी भरल्यानंतर त्यात अडकून असलेला एक साप नजरेस आल्यावर, त्याची तिथून सोडवणूक करण्याकरता *जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सदस्य रघुनाथ भुते* यांना पाचारण करण्यात आले.
गोदिया जिला वनअधिकारी श्री.*प्रदीप पाटिल*, तसेच आमगाँवचे आरएफओ श्री.*रवि भगत* यांच्या मार्गदर्शनाखाली,रघुनाथ भुते यांनी छोटा आकाराच्या, तसेच अत्यंत अडचणीच्या त्या ३० फूट खोल विहिरीतून बराच त्रास व कष्ट घेत, वनरक्षक अनिल पवार यांच्या सहकार्याने त्या विषारी कोबरा सापाची सोडवणूक केली व नंतर त्यास जीवनदान देत त्याला, त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. सापाला पकडण्यादरम्यान मंगलमूर्ती चुटे,सुनिल चुटे आणि घटनास्थळी उपस्थीत गावकरी मंडळीनी पण मदत केली, तसेच गोंदिया जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सदस्य रघुनाथ भुते आणि संपूर्ण वनविभागाचे आभारसुद्धा मानले.