भाजप प्रदेशाअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 26 ऑगस्ट रोजी गोंदियात...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यव्यापी जनसंपर्क अभियानाचा भाग म्हणून शनिवार, २६ ऑगस्ट रोजी गोंदियात येत आहेत. यावेळी ते दुपारी 4.30 वाजता कुडवा नाक्यावर पोहोचतील, त्यानंतर ते थेट गांधी पुतळा चौकात पोहोचून जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ करतील, यानिमित्ताने ते भाजप कार्यकर्त्यांसोबत घरोघरी जाऊन जनसंपर्क अभियान राबवणार आहेत, हे विशेष. गांधी पुतळा ते गोरेलाल चौकापर्यंत . व यानंतर बावनकुळे छोटा गोंदिया येथील श्री.वट्टी यांच्या निवासस्थानी आदिवासी समाजातील नागरिकांची बैठक आणि मरार टोली येथे श्री.अमर रंगारी यांनी आयोजित केलेल्या दलित समाजातील नागरिकांची बैठकीत भाग घेणार असून, त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता पवार बोर्डिंग हॉलमध्ये भाजप कार्यकर्त्यांना संबोधित व मार्गदर्शन करतील.सर्व कार्यक्रमांना भाजप कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा भाजप अध्यक्ष येशुलाल उपराडे यानि केले आहे.